गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत ?; शिवसेनेचा सवाल

Foto
दिल्ली जळत असताना, आक्रोश करीत असताना गृहमंत्री अमित शहा कुठे होते ? काय करीत आहे  ? असा सवाल शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून विचारला गेला आहे. तसेच दिल्ली हिंसाचारावरुन शिवसेनेनं भाजपला धारेवर धरले आहेत. 

विधानसभा निवडणुकीत अमित शहा हे गृहमंत्री असतानाही घरोघर प्रचार पत्रके वाटत फिरत होते व या प्रचार कार्यासाठी त्यांनी भरपूर वेळ काढला होता, पण संपूर्ण दिल्लीत हिंसेचा आगडोंब पेटला असताना हेच गृहमंत्री कुठे दिसले नाहीत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

वीर सावरकरांच्या गौरवासाठी जे राजकीय नौटंकी करीत आहेत त्यांनी देशाच्या गौरवाचा विचार करावा. राजधानीतला हिंसेचा धूर देशाला गुदमरून टाकत आहे. त्या धुरात देशाचे गृहमंत्री कुठेच दिसत नाहीत. चिंता वाटावी असा हा प्रकार आहे!, अशी टीका अग्रलेखात करण्यात आली आहे.

केंद्रातले एक मंत्री अनुराग ठाकूर, खासदार परवेश वर्मा व कपिल मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आता दिल्ली हायकोर्टाने दिले. ज्यांनी हे आदेश दिले त्या न्यायमूर्तींनाच सरकारने शिक्षा ठोठावली, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker